आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Shahrukh Khan Ambassador Interpol

अभिनेता शाहरुख खान इंटरपोलचा अॅम्बेसेडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटरपोलने "टर्न बॅक क्राइम' या अभियानासाठी भारतातून सुपरस्टार शाहरुख खानची अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक जण काय करू शकतो याविषयी या मोहिमेतून जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

इंटरपोलच्या जागतिक मोहिमेसाठी पहिल्यांदा एका भारतीयाची अॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याचे शाहरुखने या वेळी सांगितले. जेव्हा नागरिक कायद्याचा आदर करून गुन्हेगारी विरोधात लढा देतात, तेव्हा त्याचा फायदा सर्व समाजाला होतो, असा संदेश देताना शाहरुख दिसणार आहे. इंटरपोलच्या "टर्न बॅक क्राइम' अभियानाचा अॅम्बेसेडर होणे हा विशेष सन्मान असल्याचेही तो म्हणाला. इंटरपोलच्या या मोहिमेचा जॅकी चेनसह अनेक दिग्गज कलाकारही अॅम्बेसेडर आहेत.