आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड कलाकारांचे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान..’ मतदानाला दांडी मारून ‘आयफा’ला हजेरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘देशातील नागरिक ज्यांना आदर्श मानतात, अशा कलाकारांनीच आपले मतदानाचे कर्तव्य बजावण्याऐवजी परदेशातील पुरस्कार सोहळय़ाला जाण्यास प्राधान्य दिले आहे. हा प्रकार लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. त्यामुळे या कलाकारांचा पासपोर्ट जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून केली आहे. निवडणुक आयुक्तांनाही त्याची एक प्रत पाठविली आहे.
सरनाईक म्हणाले की, बॉलीवूडमधील कलाकार इतरांना मतदान करण्याचा उपदेश करतात. मात्र ‘पद्र्मशी’ सैफअली, शाहिद कपूर, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, करिना कपूर खान, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आदी कलाकार या दरम्यान परदेशात जात आहेत. 23 ते 26 एप्रिल दरम्यान अमेरिकेत आयफा पुरस्कार सोहळा होत आहे. तर 24 एप्रिल रोजी मुंबईत मतदान होणार आहे.
मतदान टाळून या कार्यक्रमाला जाणार्‍या कलाकार, तंत्रज्ञांचे पासपोर्ट जप्त करावे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.