आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचे सांगत अभिनेत्रीवर दोन वर्षे बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
32 वर्षीय पीडित अभिनेत्री मूळची चंदीगडची आहे. - Divya Marathi
32 वर्षीय पीडित अभिनेत्री मूळची चंदीगडची आहे.
मुंबई- मी मनसेचा पदाधिकारी आहे तसेच राज ठाकरेंचा निकटवर्तीय आहे. माझी बड्या लोकांशी ऊठबस आहे. त्यामुळे तुला चित्रपटांत सहजपणे काम मिळवून देईन असे सांगत एका व्यक्तीने एका अभिनेत्रीचे अपहरण करून गेली दोन वर्षे बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित अभिनेत्रीने काही हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.
अल्ताफ मर्चंट असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात मागील महिन्यात मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक झाली नाही. अल्ताफ मर्चंटच्या राजकीय वजनामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नाही असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. दरम्यान, अल्ताफ याने वांद्रे कोर्टात अंतरिम जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
अभिनेत्रीने केलेल्या आरोपानुसार, अल्ताफ मर्चंटशी 2014 साली तिच्याशी ओळख झाली. त्यावेळी आपण निर्माता असल्याचे सांगितले. तसेच बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी आपण मनसेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले. अभिनेत्रीचा विश्वास संपादन करण्यासाठी अल्ताफने राज ठाकरेंबरोबरचे फोटो दाखवले. राज ठाकरेंचे आपण निकटवर्तीय असून, अनेक बड्या लोकांशी आपले संबंध आहेत. त्यामुळे तुला चित्रपटात सहजपणे काम मिळवून देईन असे आमिष दाखवले. यादरम्यान, अल्ताफने अभिनेत्रीशी जवळिक वाढवली व तिला ड्रग्जचे व्यसन लावले. पीडित अभिनेत्री पूर्णपणे आपल्या जाळ्यात आल्याचे पाहून अल्ताफ मर्चंटने तिला आपल्या घरात कैद करून ठेवले. गेली एक-दीड वर्षे तो तिचे लैंगिक शोषण करीत होता, असा आरोप पीडित अभिनेत्रीने केला आहे.
अल्ताफने यापूर्वीही अनेक मुलींना फसवलं-
अल्ताफ मर्चंटने यापूर्वीही आपल्या राजकीय संबंधाचा फायदा घेत अनेक मुलींना फसवले आहे. तो सुरुवातीला निर्माता असल्याचे सांगतो व मुलींना जाळ्यात ओढतो. त्यानंतर त्यांना ड्रग्जचे व्यसन लावतो. यात बहुतेक मुलीचे आयुष्य तो उद्ध्वस्त करतो. त्याच्या घरात मी मुलीचे कपडे व साहित्य पाहिले आहेत. त्यामुळे त्याने अनेक मुलींना फसविल्याचे मला कळाले. त्यानंतरच मी तेथून पळ काढला असा दावा संबंधित अभिनेत्रीने केला आहे.
ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी रिहॅबेलेशन सेंटरमध्ये उपचार-
आपण फसविले गेल्याच्या भावनेतून आणि ड्रग्जच्या व्यवसनातून बाहेर येण्यासाठी मुंबई सोडून मी डेहराडूनला गेले. तेथील एका रिहॅबेलेशन सेंटरमध्ये मी दोन महिने उपचार घेतले त्यानंतर मी मुंबईत आले. त्याचवेळी अल्ताफचा खरा चेहरा आणण्याचा निश्चय केला. 14 मे 2016 रोजी तिने अल्ताफविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफला अद्याप अटक झाली नाही.
पुढे वाचा,
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...