आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिम्मत असेल तर समोर येऊन बोला, लेक गमावलेल्या पित्याचे ड्रीम गर्लला उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजस्थानातील दौसा येथे झालेल्या अपघाताप्रकरणी बॉलिवूड अभ‍िनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी मौन तोडत अपघाताचे खापर मृत मुलीच्या वडिलांवर फोडले होते. मुलीच्या वडिलांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले असते, तर अपघात घडलाच नसता, असे ट्विट हेमामलिनी यांनी केले आहे. पण हेमा मालिनींच्या या दाव्याला मृत मुलीच्या वडिलांनी उत्तर दिले आहे. हिम्मत असेल तर हेमा मालिनी यांनी हे समोर येऊन बोलून दाखवावे. मी एकही नियम मोडला नाही, असे हनुमान खंडेलवाल म्हणाले. दुसरीकडे, हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल दौसा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संवेदना आणि आरोपही...
'दौसा येथे झालेला अपघात फारच दुर्दैवी होता. या अपघातात एका चिमुरडीचा मृत्यू झाला याचे मला अत्यंत दु:ख आहे. तसेच तिचे पालक गंभीर जखमी आहेत. मुलीच्या वडिलांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले असते तर हा भीषण अपघात झालाच नसता. त्याचप्रमाणे मुलीवरही मृत्यू ओढवला नसता', असे हेमामलिनी यांनी आपल्या 'ट्विट'मध्ये म्हटले आहे.
तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या चाहत्यांचे आभारही हेमा मालिनी यांनी मानले आहेत. परंतु, आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणार्‍या मीडियावर जोरदार टीकास्त्रही हेमामालिनी यांनी लादले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जाताना राजस्थानातील दौसा येथे त्यांची मर्सिडीज अल्टो कारला आदळली होती. या अपघातात अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच हेमा मालिनी यांच्यासह मुलीचे वडील, आई, आणि लहान भाऊ तसेच एक महिला, असे पाच जण जखमी झाले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हेमामालिनी यांच्या अपघातानंतरची छायाचित्रे...