आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैलाच्या फार्म हाऊसवर पॉलिटिकल पार्टीचा झेंडा, स्वतःला एनसीपीचा महासचिव असल्याचे सांगत होता टाक !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या हत्येचे रहस्य उलगडायला सुरुवात झाली आहे. पोलिसांना लैलाचा मेकअप बॉक्स सापडला आहे. तर मृतदेह शोधण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात मानवी अवशेष आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
लैलाची हत्या संपत्तीसाठी केल्याचे तिचा सावत्र बाप परवेझ टाक याने कबुली जबाबात म्हटले होते. त्याने लैलासह तिच्या कुटुंबियांची हत्या करून इगतपुरीजवळील उंटदरी परिसरात असलेल्या फार्म हाऊसजवळ दफन केले होते, असे परवेझ याने सांग‍ितले होते. त्यानुसार क्राइम ब्रँचचे अधिकारी आज सकाळी उंटदरीत दाखल झाले आहेत. दोनशे पोलिस लैलाचा मृतदेह शोधण्यासाठी परिश्रम घेत आहे.
फार्म हाऊस परिसरात पोलिसांनी चोख बदोबस्त ठेवला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एक मर्यादा आखून दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या पुण्यातील फार्म हाऊसवर एका राजकीय पक्षाचा झेंडा सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. हा झेंडा राष्‍ट्रवादी कॉग्रेसचा असल्याचे बोलले जात आहे. परंतु याला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही. तपासात पोलिस कमालीची गोपनियता पाळत आहे.
यापूर्वीही लैलाच्या पर्सनल अल्बममध्ये अनेक बडे पोलिस अधिकारी आणि नेत्यांची छायाचित्रे सापडली होती. त्यामुळे लैलाचे पॉलिटिकल कनेक्शन असल्याचा संशंय बळावला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या ठावठिकाण्याचे गूढ कायम? अज्ञातस्थळी की खून?