आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेमची गर्लफ्रेंड मोनिकाच्या अंघोळीसाठी डव साबण; जेलरने बाथरुममध्ये बसवला होता CCTV कॅमेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/भोपाळ- 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात स्पेशल टाडा कोर्टाने अबू सालेमसह पाच दोषींना शिक्षा सुनावली. अबू सालेम याला जन्मठेपेजी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला अबू सलेमचे भोपाल कनेक्शनबाबत माहिती घेऊन आलो आहे.

अबू सलेमने स्वत:चा आणि गर्लफ्रेंड मोनिका बेदी हिचा बनावट पासपोर्ट भोपाळ येथून बनवला होता.  या प्रकरणी दोघांना तुरुगांत जावे लागले होते.

मोनिकाला अंघोळीसाठी पोलिस अधिकारी पाठवत होते 'डव' साबण 
-सन 2002 मध्ये पुर्तगालमध्ये मोस्ट वॉन्टेड डॉन अबु सलेम आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस मोनिका बेदी हिला पोलिसांनी अटक केली होती. बनावट पासपोर्टच्या खटल्यात मुंबई पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सालेम याला सेंट्रल जेल तर मोनिकाला भोपाळमधील जहागीराबाद पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. जेल परिसरात हाय सिक्युरिटी तैनात करण्‍यात आली होती.
- विशेष म्हणजे जहागीराबाद पोलिस ठाण्यात पोलिसांनी मोनिका बेदीची चांगलीच आवभगत केली होती. तिच्या आवडीनिवडीचीही काळजी घेतली होती.
- तिला अंघोळीसाठी जेलमध्ये पोलिस अधिकारी 'डव' साबण उपलब्ध करून देत होते. इतकेच नाही तर तिच्यासाठी हॉटेलचे जेवण आणि महागडे कॉस्मेटिक जेलमध्ये पाठवले जात होते. तिच्यासोबत फोटोही क्लिक करत होते.
- दुसरीकडे, सेंट्रल जेलमध्ये खुद्द पोलिस अबू सालेमला सलाम ठोकत होते.
-दरम्यान, 16 जून 2017 रोजी विशेष टाडा कोर्टाने अबू सलेम, मुस्तफा डोसा, मोहम्मद डोसा, फिरोज अब्दुल राशिद खान, ताहिर मर्चेंट आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवले होते. यापैकी मुस्तफा डोसा याचा 28 जूनला हार्टअटॅकने मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... या जेलरने मोनिकाच्या बाथरुममध्ये बसवला होता सीसीटीव्ही कॅमेरा...
बातम्या आणखी आहेत...