आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडची नजर सणासुदीवर, हजार कोटींच्या गल्ल्यावर लक्ष!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑगस्ट ते डिसेंबरच्या दरम्यान शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार, अजय देवगण या बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या महत्त्वाकांक्षी चित्रपटांची बॉक्स ऑफिसच्या कमाईची उद्दिष्टेही मोठीच आहेत. 2014च्या पहिल्या सहामाहीत बड्या स्टार्सचे फारसे चित्रपट झळकले नाहीत. सध्या किक चित्रपट 200 कोटींच्या उंबरठ्यावर आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात 300 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवून हे चित्रपट निर्माण केले जात आहेत. शाहरुख खानच्या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने 320 कोटींचा बिझनेस केला. मात्र, त्याच्या या दिवाळीत प्रदर्शित होत असलेल्या ‘हॅपी न्यू इयर’चे 370 कोटींचे टार्गेट आहे. हे टार्गेट यशस्वीरीत्या गाठण्याच्या संपूर्ण शक्यता आहेत. हृतिक रोशन एका वर्षात एकच चित्रपट करतो. ‘क्रिश 3’ ने 190 कोटींचा हिंदी प्रिंटमध्ये, तर 80 कोटींचा जागतिक व्यवसाय केला. ‘बँग बँग चित्रपट हिंदी प्रिंटमध्ये 225 कोटींचा व्यवसाय करेल, असा अंदाज आला आहे.