आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडमध्ये ब्लॅक मनीचा धंदा जोरात; बडे मासे स्टिंग ऑपरेशनच्या घे-यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवूडमध्ये काळा पैसा लावून चित्रपट तयार करण्याची बाब नवीन नाही. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने अनेक चित्रपटांत त्याचा पैसा गुंतवला होता असे सांगितले जाते. नुकत्याच एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉलीवूडमधील ही बाब उघड झाली आहे.
काही वर्षांपूर्वी सलमान खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटासंदर्भात ब्लॅक मनीमुळे मोठे वादंग माजले होते. नुकत्याच झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बॉलीवूडच्या अनेक दिग्गज निर्मात्यांनी या ब्लॅकमनी वापराचे फंडे सांगितले. अनेक बड्या निर्मात्यांचा यात समावेश आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानी, अनीस बज्मी, अनुभव सिन्हा, मॉडेल पायल रोहतगी, संग्राम सिंह आणि आरती छाब्रिया यांनी स्टिंग ऑपरेशनदरम्यान बॉलीवूडधील काळ्या पैशाबाबत कबुली दिली आहे. याबाबत अनुभव सिन्हा यांनी अनुभवाचे बोल सांगत म्हटले की, बॉलीवूडमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करणे अतिशय सोपे आहे. केवळ एकच काम करायचे, बिग बजेट चित्रपट करायचा. मग तो फ्लॉप झाला तरी चालेल. नुकताच त्यांची निर्मिती असेलला रा.वन हा चित्रपट याचे बोलके उदाहरण आहे. तसेच बॉलीवूडमध्ये ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी अनेक जण उत्सक आहेत. मात्र त्यांचे नाव आम्ही जाहीर करू शकत नसल्याचे अनुभव यांनी या स्टिंग ऑपरेशनदरम्यान सांगितले. वासू भगनानी यांनी बॉलीवूडला आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ते म्हणतात, माझ्याजवळ ब्लॅक मनी व्हाइट करण्याचे अनेक फंडे आहेत. या व्यवहारात ‘कॅश’ व ‘चेक’चे गणितही भगनानी यांनी सांगितले. अनीस बज्मी यांनीदेखील बॉलीवूडध्ये ब्लॅक मनी असल्याचे कबूल केले. दरम्यान, बॉलीवूडमधील ब्लॅक मनीबाबत केंद्रीय मंत्री वीरप्पा मोइली आणि अंबिका सोनी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कलाकारांना देण्यात येणारे मानधनदेखील ब्लॅक पद्धतीने घेण्यात येते. मॉडेल पायल रोहतगी आणि तिचा सध्याचा प्रियकर संग्राम सिंह एक चित्रपट करत आहेत. त्यांनी त्यांचे मानधन प्रत्येकी 30 लाख रुपये एवढे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात कागदोपत्री हे कलाकार 5 लाख रुपयांच्या रकमेवर सही करतात. म्हणजेच सुमारे 25 लाख रुपयांचा घोळ.