आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; इतरांना प्राेत्साहनही, साेशल मीडियावर ‘सेल्फी’ अपडेट करण्यासाठी सेलिब्रिटींची चढाअाेढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चित्रपट कलाकार, सेलिब्रिटीज मतदानाला बाहेर पडत नाहीत असे म्हटले जात असे. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीपासून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडत असल्याचे चित्र समाेर येत अाहे.  त्याचाच प्रत्यय मंगळवारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अाला.
 
अगदी शाहरुख खान, गुलजार, जॉन अब्राहमपासून रेखा, श्रद्धा कपूर, नाना पाटेकर यांच्यापासून आदिनाथ कोठारे, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण यांच्यापर्यंत अनेक कलाकार मंगळवारी मतदान करताना दिसले. एवढेच नव्हे तर जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही या कलाकारांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना केले.
   
बॉलीवूडमधील कलाकार मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडले. जुहू आणि वांद्रे येथे बॉलीवूड कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळवारी जुहू आणि वांद्रे पश्चिम येथील निवडणूक केंद्रावर अनेक कलाकार रांगा लावून मतदान करताना दिसून आले. आमिर खानची पत्नी किरण रावने मतदान केले.
 
‘मनपाची निवडणूक ही थेट मतदारांच्या कामाशी संबंधित असल्याने प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. जनतेची रोजची कामे ही मनपाशी जोडलेली आहेत. रस्ते, पाणी या समस्या मनपाच सोडवते त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला नगरसेवक निवडणे आवश्यक आहे,’ असे किरण म्हणाल्या.   
 
मराठीतील स्वप्निल जोशी, प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी, सलील कुलकर्णी, श्रुती मराठे, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, सुकन्या मोने, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, शिल्पा नवलकर, स्मिता गोंदकर, केदार शिंदे, महेश, आदिनाथ कोठारे, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी मुंबई आणि पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. सचिन व अंजली तेंडुलकर यांनीही मतदानाचा हक्क बजावत मुंबईकरांना घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन केले.  
 
वरुणचे नाव गायब  
जॉन अब्राहम बाईकवरून मतदान केंद्रावर आला तर शाहरुखने दुपारी मतदान केले. रेखा, हेमामालिनी, श्रद्धा कपूर, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, प्रेम चोप्रा, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आदी कलाकारांनीही मतदान केले. जुहू परिसरातील केंद्रावर वरुण धवन मतदानासाठी आला खरा परंतु मतदार यादीत त्याचे नाव सापडले नाही. 


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मुंबईत मतदानाचा हक्क बजावणार्‍या बॉलीवुड स्टार्सचे  फोटोज...
बातम्या आणखी आहेत...