आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BollywoodSplit Over Narendra Modi Election News Live

धर्मनिरपेक्षतेचा जप करणा-या बॉलिवूड सेलेब्सची TWITTER घेतली \'शाळा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करण्याच्या आवाहनाची सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर वर खिल्ली उडवली जात आहे. त्यासोबतच युजर्स ट्विटरवर या बॉलिवूड कलाकारांची 'शाळा' देखील घेत आहेत. एका युजरने ट्विट केले आहे, 'मिस्टर महेश भट्ट प्रथमु तुमच्या मुलीला देशाच्या राष्ट्रपतींचे नाव माहित आहे का ते विचारा मग आपण नमो, आप आणि धर्मनिरपेक्षतेवर चर्चा करु.' एकाने ट्विट केले आहे, 'शॉटगनने धर्मनिरपेक्ष बॉलिवूडसाठी आणि मुलीच्या भविष्यासाठी तिला निवडणूक प्रचारात उतरवले नाही का? '
जवळपास साठहून अधिक बॉलिवूड कलाकारांनी नरेंद्र मोदींचे नाव न घेता जनतेला धर्मनिरपेक्ष पक्षांच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉलिवूड हस्तींनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर एकमत दाखवले आहे.
बुधवारी सलामान खानचे वडील सलीम खान यांनी नरेंद्र मोदी यांची उर्दू वेबसाइट लॉन्च केली आणि त्यांनी मोदींच्या राज्यात मुस्लिम सुरक्षीत असल्याचेही म्हटले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये जणू धर्मनिरपेक्षतेची लाटच आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, चित्रपट कलावंताची ट्विटर अशी घेतली शाळा