आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी; आरपीएफसह पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चर्चगेट रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून  दिली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवर मोठा फौजफाटा तैनात करण्‍यात आला आहे. आरपीएफ आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

खोटीही असू शकते धमकी..
- मुंबईतील आरपीएफच्या कंट्रोल रूममध्ये आज (गुरुवारी) सकाळी अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि  रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने (आरपीएफ) सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
- डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडला (बीडीएस) पाचारण करण्यात आले आहे.
- मात्र, अद्याप पोलिसांना संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही धमकी खोटीही असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
- दरम्यान, अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हायअलर्ट जारी केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा... सर्च अॉपरेशनचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...