आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील या स्‍फोटाने 8 दिवस विझली नव्‍हती आग, मृतदेहांचे पडले होते खच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मायानगरी मुंबई 14 एप्रिल 1944 हा दिवस कधीही विसरणार नाही. याच दिवशी स्‍फोटकांनी भरलेल्‍या ब्रिटीश मालवाहू जहाजाला आग लागली अन् अवघी मुंबई जीव मुठीत धरून धावत होती. काही क्षणात मृतदेहांचे खच पडले. हजारो लोक बेघर झाले. अग्‍निशमन दलाचे कैक जवान मृत्‍यूमुखी पडले. आग विझवायला ना माणसं शिल्‍लक होती, ना सामुग्री. अवघ्‍या मायानगरीला हादरून सोडणा-या या स्‍फोटाची साधी आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो.

जहाजात होते 1400 टन स्‍फोटके....
ब्रिटीश मालवाहू जहाज एसएस फोर्ट स्‍टायकीन हे कापूस, सोने, हत्‍यारे आणि 1400 टन स्‍फोटके घेऊन मुंबईत आले होते. हे जहाज गोदीत उभे असताना अचानक दोन भयंकर स्‍फोट झाले. कॅप्टन ब्रेन्ली ओब्रेस्ट हा ब्रिटिश आर्मीचा अधिकारी दुपारच्या जेवणासाठी नुकताच घरी पोहोचला होता. तो जेवायला बसणार तेवढ्यात त्याला या घटनेचा निरोप मिळाला की, व्हिक्टोरीया गोदीमध्ये सामान उतरवत असताना एका जहाजाला आग लागली. ते जहाज स्‍फोटकांनी भरले होते. पाहता पाहता शेजारी असलेल्‍या इतर जहाजही भडकल्‍या. झोपडपट्टीसह आजूबाजूचा परिसरही पेटला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे सैरावैरा धावत होते लोक.., जहाजातील सोन्‍याच्‍या विटा विखुरल्‍या होत्‍या, जागोजागी आगी लागल्‍या..., गोदामे भस्मसात झाली.., अग्‍निशमन दलाचे जवान मृत्‍यूमुखी पडले..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा या घटनेचा व्‍हिडीओ... (सौजन्‍य- युनिव्हर्सल न्यूजरील)