आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay HC Asks CID, CBI To Get Report From Karnataka For Dabholkar Pansare Murder Case

दाभोलकर प्रकरणात बॅलेस्टिक अहवालास उशीर का: हायकोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉ.गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक सीआयडीकडून बॅलेस्टिक अहवाल प्राप्त करण्यास उशीर का होत आहे, अशी िवचारणा उच्च न्यायालयाने सीआयडी सीबीआय या तपास यंत्रणांकडे गुरुवारी करुन हा अहवाल तातडीने मागवून घेण्याचे अादेश दिले अाहेत.

दाभोलकर पानसरे यांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक सीआयडीला सोपवण्यात आल्या. या तिघांच्या हत्येत साधर्म्य आढळून आले आहे. गुरुवारी पानसरे आणि दाभोलकर यांच्या वतीने अॅड. अभय नेवगी यांनी न्यायालयात सांगितले, ‘या तिघांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूकही सारखीच आहे, असा अहवाल बंगळुरूच्या प्रयोगशाळेने दिला आहे. ताे मिळवणे गरजेचे आहे. यावर सीबीआयचे वकील अनिल सिंग आणि सरकारी वकील संदीप शिंदे म्हणाले, ‘कर्नाटक पोलिसांना अाम्ही पत्र लिहिले आहे. मात्र, अजूनही अहवाल प्राप्त झाला नाही.’ त्यावर न्यायालय म्हणाले, ‘तुम्ही पाठपुरावा केला आहे का? सीबीआयसारखी संस्था अशी उत्तरे देते यावर आश्चर्य वाटते. तसेच कर्नाटक सीआयडी सहकार्य करत नाही, हे हास्यास्पद वाटते.’