आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay HC Asks Cops To Act On Complaint Against Sunil Tatkare

तटकरेंवरील आरोप; योग्य दखल घ्यावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करून त्याबाबत माहिती द्यावी. तसेच यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. आरोपांबाबत सोमय्यांकडून माहिती घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तटकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप करणारी याचिका सोमय्या व भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला होईल.