आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणी काेर्टाने तपास यंत्रणांना सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रत्येक सुनावणीला आपण फक्त तपास अहवाल सादर करता, मात्र त्यात कोणतीही प्रगती दिसत नाही, त्यामुळे पुढच्या वेळी अहवाल सादर करताना काहीतरी प्रगती करून अहवाल सादर करा, अशा शब्दांत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना सुनावले. संबंधित तपास यंत्रणांचे काम अजिबात समाधानकारक नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत येत्या २३ जूनपर्यंत नव्याने तपास अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

मंगळवारी सुनावणीदरम्यान सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास अहवाल तर गुन्हे अन्वेषण विभागाने पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. त्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांनी तपास यंत्रणा अद्यापही काेणत्याही निष्कर्षापर्यंत न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. किमान अशा महत्त्वाच्या प्रकरणांत तपास यंत्रणांनी झपाट्याने काम करणे अपेक्षित आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांवर राजकीय दबाव किंवा काही अडचणी असतील तर त्याबाबत आताच स्पष्टपणे त्यांनी न्यायालयाला सांगावे. किमान या टप्प्यावर तरी तपास यंत्रणांनी निश्चित दिशेने तपास करावा, असेही न्यायालयाने नमूद केले. या तपासादरम्यान दोन्ही तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा सुरुवातीच्या टप्प्यावर तपास केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तसेच दाभोलकर आणि पानसरे कुटंुबीयांच्या नियमित संपर्कात राहावे, असेही न्यायालयाने सूचित केले.

धार्मिक स्थळी तपासासाठी जा, फक्त दर्शनासाठी नकाे
या हत्या प्रकरणात जर कोणाचा तरी थेट सहभाग दिसत नसेल, तर कुणाचा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा शोध घेण्याचा सल्ला न्यायालयाने तपास यंत्रणांना दिला. ‘एखाद्या धार्मिक किंवा प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन तपास करण्याऐवजी फक्त दर्शन घेऊन येऊ नका’, असा टोलाही न्यायालयाने या वेळी तपास यंत्रणांना लगावला.
बातम्या आणखी आहेत...