आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींच्याच अपिलावर सुनावणीची घाई कशामुळे? याचिकेवर कोर्टाकडून नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- २००९ पासूनच्या याचिका प्रलंबित असताना अभिनेता सलमान खान आणि शायनी आहुजांसारख्या सेलिब्रिटींच्या अपिलावर वेळेच्या आधीच सुनावणी करण्याची घाई का, असा सवाल एका याचिकेद्वारा मुंबई उच्च न्यायालयास विचारण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याबाबत नोटीस जारी केली आहे.

न्यायालय सेलिब्रिटींच्या याचिकांना अधिक महत्त्व देत असल्याचे या याचिकेतून म्हटले आहे. त्यावर न्या. मोहित शाह यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने अशा प्रकारे अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या अपिलांचा अहवाल २४ जुलैपर्यंत रजिस्ट्रारकडून मागवला आहे. शशिकला भगवान गांगुर्डे यांनी हत्येचा आरोपी असलेला पती आणि अन्य दोषींकडून ही याचिका दाखल केली आहे.

त्यांच्या मते, शायनी आहुजाला मार्च २०११ मध्ये मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्याचे अपील अंतिम सुनावणीसाठी पटलावर आलेले आहे. शिवाय, १३ वर्षे जुन्या हिट अँड रन प्रकरणातही सलमान खानला कनिष्ठ न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून त्याचे अपीलसुद्धा अंतिम सुनावणीसाठी पटलावर आले आहे. तुरुंगात खितपत पडलेल्या गरिबांकडे कानाडोळा करत सेलिब्रिटींच्या अपिलांना "आऊट ऑफ टर्न' ठरवत अंतिम सुनावणीसाठी पटलावर आणणे योग्य आहे काय? न्यायदेवतेच्या मंदिरातील कामकाजातही भेदभाव योग्य आहे काय? असे सवाल याचिकेतून करण्यात आले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि महाराष्ट्र सरकारला प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सलमानच्या अपिलावर स्थगितीस नकार

बातम्या आणखी आहेत...