आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामटेंच्या कॉल रेकॉर्ड‌्स चौकशीला दिली स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी शहीद आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांचा वायरलेस व पोलिस नियंत्रण कक्ष यांच्यात काय चर्चा झाली, याच्या चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी महाराष्ट्र सरकारला दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीला स्थगिती दिली.

राज्य सरकारनेच मुख्य माहिती आयुक्तांच्या आदेशाला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती व्ही. एल. अांचलिया आणि न्यायमूर्ती अनुप मोहता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकारने उपस्थित केलेला मुद्दा विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे आम्ही या याचिकेवर अंतिम आदेशापर्यंत अंतरिम स्थगिती देत आहोत.’

कामटे यांची पत्नी विनीता यांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि त्यांच्या पतीची व्हॅन यांच्यात झालेल्या संवादाची माहिती मागितली होती. याच व्हॅनमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकरही शहीद झाले होते.
बातम्या आणखी आहेत...