आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay High Court Begins Dictation Of Verdict In Salman Khan's Hit and run Case

सलमानच्या अपिलावरील निकाल वाचन सुरू, हिट अॅँड रन प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अॅँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या अपिलाच्या निकाल वाचनास न्या. ए. आर. जोशी यांनी साेमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निकाल वाचनास सुरुवात केली.

सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचे कलम लागू शकते का, सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याच्या मृत्यूमुळे सत्र न्यायालयात त्याची उलटतपासणी न झाल्याने त्याने दिलेला जबाब ग्राह्य मानायचा का, सलमानच गाडी चालवत होता का, अपघाताच्या वेळी सलमान मद्याच्या अमलाखाली होता का, गाडीत किती लोक होते, गायक कमाल खान गाडीत होता का, अशा सात प्रमुख मुद्द्यांचा ऊहापोह होणार आहे. चालक अशोक सिंगने आपणच गाडी चालवत असल्याची दिलेली साक्ष ग्राह्य मानावी का, सलमानच्या रक्तात अल्कोहोल होते का, तसेच मृत व्यक्ती सलमानच्या गाडीखाली येऊन नव्हे तर अपघातग्रस्त गाडी क्रेनने उचलताना मृत्युमुखी पडली होती, यासारखे सलमानच्या वकिलांनी केलेले दावे योग्य होते का याचीही उत्तरे या निकाल वाचनातून स्पष्ट होणार आहेत.