आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारमध्ये पोलिसांची गरज काय? : कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारने कोणत्या कायद्याच्या आधारे पोलिसांना रेस्टॉरंट किंवा बारमध्ये नियुक्त केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. ठाण्यात महिला वेटर्स असणार्‍या काही बारमध्ये पोलिस तैनात असल्याबाबत ही विचारणा करण्यात आली आहे.

पोलिसांना तैनात करण्याच्या पावलाविरोधात बार मालक संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीप्रसंगी न्यायमूर्ती एन.एच.पाटील आणि अभय टिपसे यांनी सरकारला ही विचारणा केली. याठिकाणी पोलिसांना तैनात करण्यामागचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना न्यायालयाने ठाणे पोलिसांना केल्या आहेत. अशा ठिकाणी तैनात असणार्‍या पोलिसांनी बार मालकांना ढील देणे व कर्तव्य बजावणे याचा ताळमेळ बसवावा, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. महिला वेटर्स काम करताना मर्यादा ओलांडणार नाहीत यावर नजर ठेवण्यासाठी अशा प्रकारे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.