आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार, BMC वर मुंबई हायकोर्टाचे ताशेरे; पावसाळी उपाययोजनांसाठी उचलेले नाही 1 इंचही पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुसळधार पावसाने अनेक मुंबईकरांनी आपले प्राण गमावल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने शनिवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना निसर्गाला आपण नियंत्रित करु शकत नाही पण गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पावसाचा सामना करत असताना प्रशासनाने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केली नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत 12 इंच पाऊस झाला होता. अनेक भागात पाणी साचले होते. या पावसाने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.
 
डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्याची मागणी
- हायकोर्टात मुख्य न्यायाधीस मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीर एन. एम. जमदार यावर सुनवाई करत आहेत. वकील अटलबिहारी दुबे यांच्यावतीने मागील वर्षी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल व नागरिकांना आपला जीव गमवावा लागणार नाही.
- मुख्य न्यायाधीश म्हणाले, आपण निसर्गाला नियंत्रित करु शकत नाही. पण मुंबई अशी स्थिती पहिल्यादाच निर्माण झालेली नाही. खूप वर्षांपासून पावसाळ्यात अशी स्थिती निर्माण होते पण आपण याबाबत 1 इंचाचीही प्रगती केलेली नाही.
- सुनवाई दरम्यान वकिलांनी सांगितले की, एका वर्षात डॉप्लर रडार यंत्रणा उभारण्यासाठी कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. आता कोर्टाने राज्य सरकारला आणि महापालिकेला गोरेगाव भागात सर्वे करण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.
 
29 ऑगस्टला झाली होती मुंबई ठप्प
- मुंबईत 29 ऑगस्टला 9 तासात 298 मिमी म्हणजेच 30 सेंटीमीटर किंवा 12 इंच म्हणता येईल इतका पाऊस झाला होता. शहराच्या अनेक भागात त्यामुळे पाणी साचले होते. या प्रभाव रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पडला होता. रेल्वेसेवा तर जवळजवळ ठप्पच झाली होती.
- लो व्हिजिबिलिटीमुळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळ उड्डाणेही थांबवावी लागली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सरकारने कार्यालयाने सुट्टी दिली होती. शाळा आणि कॉलेजही दुसऱ्या दिवशी बंद होते.
- यापूर्वी जुलै 2005 मध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही हजारो लोक रात्रभर रस्त्यावरच होते. जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला होता. 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईत जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली होती. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...