आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay High Court Stays Adarsh Scam Trial Against Ashok Chavan

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांविरुद्धच्या ‘आदर्श’ खटल्यास स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील बहुचर्चित आदर्श घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.

चव्हाण यांच्याविरुद्धचा खटला निकाली काढण्याची सीबीआयची विनंती विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली होती. या निर्णयाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी चव्हाणांविरुद्ध खटल्यास स्थगिती दिली. मात्र, आदर्श घोटाळ्यातील अन्य आरोपींविरुद्धचा खटला सुरूच राहील, असेही स्पष्ट केले आहे.

62 आरोपींविरुद्ध खटला चालणार
सीबीआयने या घोटाळ्यात आदर्श सोसायटीचा मुख्य प्रवर्तक आर.सी. ठाकूरसह 63 जणांविरुद्ध आरोपपत्रे आहेत. या निर्णयामुळे चव्हाण वगळता इतर आरोपींविरुद्ध खटला सुरू राहणार आहे.