आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay High Court Tells State To List Steps To Protect Women

छेडछाड रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात महिला व मुलींसोबत होणार्‍या छेडछाडीच्या घटनांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. त्याच वेळी औरंगाबाद, नागपूरसह विविध शहरांत अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने केलेल्या उपायांची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
न्यायमूर्ती व्ही. एम. वानखेडे व न्यायमूर्ती प्रमोद कोडे यांच्या खंडपीठाने गुरुवारी सरकारला हे निर्देश दिले. न्यायालयाने सरकारला विचारले की सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशाअंतर्गत तुम्ही कोणती पावले उचलली आहेत? या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलिस स्टेशनला आवश्यक दिशनिर्देश देण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिस महासंचालकांना दिले. याआधी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना महिलांसोबत होणारी छेडछाड व शोषण रोखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारचे वकील जयेश याज्ञिक यांनी खंडपीठासमोर सादर केलेल्या अहवालात सरकारने महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दिली.