आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी तूर्तास कायमच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॅगीवरबंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामागील भूमिका दोन आठवड्यांत मांडा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. मात्र मॅगीवरील कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
मॅगीची उत्पादक कंपनी नेस्ले इंडियाच्या याचिकेवर शुक्रवारी न्या. व्ही. एम. कानडे न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केंद्राने बंदी घातली म्हणून आम्ही ती घातली नाही. स्वतंत्रपणे तपासणी केल्यानंतरच हा निर्णय घेतला. त्याबाबतचे अधिकार आम्हाला असल्याची भूमिका राज्य सरकारतर्फे हंगामी महाधिवक्ते अनिल सिंग यांनी मांडली. कंपनीने आपली उत्पादने आधीच बाजारपेठेतून बाहेर घेतली आहेत. त्यामुळे तूर्तास बंदीच्या फेरविचाराची गरज नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी ३० जूनला होईल.