आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay Natural History Society Orgnised Domestic Abroad Tour

‘बॉम्बे नॅचलर हिस्ट्री सोसायटी’च्या देश-विदेशात निसर्ग सहलींचे आयोजन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दरवर्षीप्रमाणे ‘बॉम्बे नॅचलर हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) यंदाही देश- विदेशात निसर्ग सहली आयोजित करून निसर्गप्रेमींसाठी तज्ज्ञ मार्गदश्रकांसोबत भटकंतीची व अभ्यासपूर्ण सहलीची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

मानस राष्ट्रीय उद्यान : हिमालयाच्या पायथ्याशी असलेले मानस उद्यान आसाम ते भूतान पसरले आहे. हत्ती, वाघ व पंगमार बिबट्या हे प्राणी तर बंगाल तणमोर, विविध धनेश, जेर्डनचा बाज व हिरवा दयाळ आदी 55 पक्षी आढळतात. 19 ते 23 ऑक्टोबरदरम्यान या ठिकाणी सहल जाणार आहे.

वन्य कर्नाटक शिबिर- अगुंबे व भद्रा अभयारण्य : कर्नाटकातील समुद्रसपाटीपासून 560 मीटर उंचीवरील अगुंबे या स्थळाला दक्षिण भारताचे चेरापुंजी म्हणतात. इथे 7-8000 मिमी पाऊस दरवर्षी पडतो. राजनाग व सिंहपुच्छ माकड येथील विशेष प्रजाती आहेत. या ठिकाणी वाघ, गवा, हत्ती, रानकुत्रा, अस्वल, सांबर, चितळ, हरण, भेकर, पिसोरी, शेकरू व उडती खार हे प्राणी सापडतात. येथील सहल 16 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जाणार आहे.

कर्नाटकातील रंगनथित्टू, बंदिपूर व नगरहोळे अभयारण्य : रंगनथित्टू अभयारण्यात चार प्रकारचे खंड्या, नदी सुरय, तीन प्रकारचे करकोचे, ठिपक्यांच्या चोचीचा झोळीवाला, मोठा ठिपकेवाला गरुड व ब्राrाणी घार हे पक्षी सापडतात. निलगिरी जीवमंडल क्षेत्रात बंदिपूर, नगरहोळे, मुदुमलाई व वायनाड अभयारण्यांचा समावेश आहे. 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ही सहल जाणार आहे.

अरुणाचल प्रदेश : पूर्व हिमालयातील अरुणाचल प्रदेश निसगसौंदर्याने समृद्ध आहे. येथील हिमालयाच्या तळटेकड्यांमध्ये पक्के व्याघ्र प्रकल्प आहे. 300 हून अधिक जातीच्या पक्ष्यांची इथे नोंद आहे. 17 ते 21 दरम्यान सहल जाणार आहे.

टांझानिया : उत्तर टांझानियात दरवर्षी दहा लाखांहून अधिक विल्डबीस्ट हरणे व झेब्रे यांचे स्थलांतर पाहता येते. त्याशिवाय मसाई गिराफ, थॉमसन गझेल हरण, चित्ता, पट्टेवाले व ठिपकेवाले तरस, आफ्रिकन सिंह, व आफ्रिकन हत्ती सहज दिसतात. या ठिकाणी 1 ते 8 मार्च 2014 दरम्यान सहल जाणार आहे. इच्छुकांनी अधिक नोंदणीसाठी (022) 22871202, 22821811 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘बीएनएचएस’ने केले आहे.