आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सावरकर-ज्ञात व अज्ञात’चे शनिवारी प्रकाशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लंडन येथे येत्या शनिवारी तिसरे सावरकर विश्व संमेलन होत आहे. लंडनच्या हिथ्रो शेरेटन येथे हे संमेलन होत आहे. कोणत्याही सरकारी अनुदानावाचून हे संमेलन होत असून यासाठी भारतातून 1६0 जण स्वखर्चाने लंडनला जाणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि ख्यातनाम लेखक व व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची व्याख्याने हे खास आकर्षण आहे. या संमेलनात शेवडे आणि दुर्गेश परुळकर यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या सावरकर - ज्ञात व अज्ञात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

वसई येथील गार्र्गीज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेत राहणारे ज्येष्ठ सावरकर अभ्यासक श्रीधर दामले करणार आहेत. याप्रसंगी लंडनमध्ये राहणारे इतिहास संशोधक वासुदेव गोडबोले व बृहन्महामंडळ,लंडनचे कार्यकर्ते उपस्थित असतील. संमेलनात डॉ. शेवडे हे ‘सावरकर-एक झंझावात’ या विषयावर सकाळच्या सत्रात बोलतील, दुपारी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. पोंक्षे हे ‘सावरकर दर्शन’ हा विषय मांडतील. सायंकाळी डॉ. शेवडे हे शिवरायांवर व्याख्यान देणार आहेत.