आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाप्रमाणे पुस्तकाचाही ट्रेलर, दृक् श्राव्य आनंद वाचकांना घेता येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्रजी साहित्यविश्वात नित्याचा ठरलेला ‘बुक ट्रेलर’ हा अभिनव प्रयाेग आता प्रथमच मायमराठीतही येत आहे. हा ट्रेलर एका मिनिटाचा असून तो यू ट्यूबवरही टाकला जाईल. पुस्तकातील एका भागावर शॉर्टफिल्मही तयार करण्यात आली आहे. हा प्रयोग अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांच्या ‘संवाद स्वतःशी’ या पुस्तकासाठी राबवला जात आहे. पुस्तकाचा संक्षिप्त दृक््श्राव्य आनंंद यातून वाचकांना घेता येईल.

परदेशातील इंग्रजी लेखकांनी आपले पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुक ट्रेलरचा आधार घेतला अाहे. हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. आगामी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जशी उत्सुकता निर्माण करणारी माहिती, दृश्ये दाखवली जातात, तसाच प्रकार बुक ट्रेलरमध्येही असतो. यात लेखक-लेखिका स्वत: आपल्या पुस्तकाची माहिती देतात.

काय आहे बुक ट्रेलर
*परदेशातील लेखकांनी काही वर्षांपूर्वीच बुक ट्रेलरचा प्रयोग केला आहे. अनेक इंग्रजी पुस्तकांसाठी बुक ट्रेलर तयार करणा-या अभिराज राजाध्यक्षने ‘संवाद स्वतःशी’ या पुस्तकाचा बुक ट्रेलर तयार केला आहे. या ट्रेलरमध्ये स्वतः लेखिका पुस्तकाच्या संदर्भात वाचकांना माहिती देणार आहे.

*‘संवाद स्वतःशी’ हा बुक ट्रेलर यू ट्यूबवर टाकून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लेखिका अनुराधा राजाध्यक्ष यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. अनुराधा यांनी यापूर्वी संध्याकाळची पहाट आणि निशांत ही पुस्तके लिहिली आहेत.

व्यक्त होण्यासाठी
जीवनात घडणा-या प्रत्येक घटनेचा काही ना काही, कुठे ना कुठे संबंध असतो; त्यामुळे त्या घटनेवर व्यक्त होणे आवश्यक असते. परंतु काही जण व्यक्त होत नाहीत. व्यक्त होणे किती आवश्यक आहे, हे स्वानुभवावरून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे अनुराधा राजाध्यक्ष यांनी पुस्तकाबाबत सांगितले.

ब्रेल लिपीतूनही : वादळवाट, रेशीमगाठी, निशांत, अरे वेड्या मना या मालिकांत अभिनय करणा-या अनुराधा यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन १० ऑगस्ट २०१५ रोजी होत आहे. अंध व्यक्तींसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीतूनही प्रकाशित होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...