आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boost For International Finance Centre At BKC In Mumbai

आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रासाठी ११ मार्चपासून निविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. बीकेसी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रासाठी (आयएफसी) निविदा प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. याच वर्षी या केंद्राचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र गुजरातऐवजी मुंबईत होणार असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’नेच गेल्या वर्षी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचे आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन या केंद्रासाठी मुंबईची निवड केली होती. या केंद्रासाठी कृती समितीची काही महिन्यांपूर्वी स्थापना केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा याचे अध्यक्ष असून उपाध्यक्षपदी पूनम महाजन यांची निवड झाली आहे. ही कृती समिती या केंद्राच्या उभारणीवर लक्ष ठेवणार आहे. धवसे म्हणाले, या कृती समितीमध्ये लवकरच काही उद्योजकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचीही निवड केली जाणार आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात मनोरंजन क्षेत्राचाही मोठा वाटा असल्याने बॉलीवूडचे प्रतिनिधी आवश्यक असल्यानेच हा निर्णय घेतला आहे. या केंद्रासाठी ११ मार्चपासून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या केंद्रासाठी उत्सुक असून कंपन्यांनी जागेची मागणी करण्यास सुरुवात केली असल्याचेही कौस्तुभ धवसे यांनी सांगितले.

६० एकर केंद्रात फिरा ट्रामने
६० एकरांवरील या केंद्रात आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कंपन्यांना स्थान असेल. हे संपूर्ण केंद्र कारफ्री असेल. पार्किंगसाठी वेगळी जागा दिली जाईल आत फिरण्यासाठी ट्रामची व्यवस्था करण्याची योजना आहे. जगातील एक सर्वोत्कृष्ट आर्थिक केंद्र म्हणून या केंद्राची ओळख व्हावी, अशी रचना केली जाणार असल्याचेही धवसे यांनी सांगितले.