आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबई: वाशी रेल्वे स्टेशनवरून 3 वर्षाच्या मुलाला पळवले, पाहा VIDEO!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाला घेऊन जाताना एक व्यक्ती सीसीटीव्हीत दिसत आहे. - Divya Marathi
मुलाला घेऊन जाताना एक व्यक्ती सीसीटीव्हीत दिसत आहे.
मुंबई- नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून एका तीन वर्षाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. दरम्यान, मुलाला एक दारूडा व्यक्ती खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. तसेच तो भरपूर दारू पिल्याचे दिसून आहे. कारण त्याला चालताही येत नसल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. रघु शिंदे (वय 3) असे अपह्त मुलाचे नाव आहे. वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, त्यांनी चौकशी सुरु केली आहे.
 
नवी मुंबईतील वाशीतील हार्बर लाईनच्या बाहेर एका वडापावच्या स्टॉलजवळून एक महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती. त्यावेळी त्याच्या आईने वडापाव घेण्यासाठी त्याचा हात सोडला. त्यानंतर दोन-तीन मिनिटांतच रघू गायब झाला. त्यानंतर आईने आरडाओरड केली पण तो सापडला नाही. यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले व त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही खंगाळले. त्यावेळी एक फुल्ल दारू पिलेला व्यक्ती त्या मुलाला खांद्यावर घेऊन जाताना दिसला. तसेच तो इतका दारू पिला होता की त्याला नीट चालताही येत नव्हते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, तो व्यक्ती नंतर पनवेलकडे जाणा-या लोकल गाडीत चढल्याचा अंदाज बांधला जात आहे. वाशी पोलिस पुढील तपास करत आहेत. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सीसीटीव्ही कैद झालेला तो व्यक्ती.....
बातम्या आणखी आहेत...