आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीतून रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेला चिमूकला सापडला; आरोपीचा शोध मात्र सुरुच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचे तिने ओळखले. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. 3 वर्षाच्या रघू शिंदेला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याने रघूचे अपहरण का केले याबाबत अजून काहीही माहिती समजू शकलेली नाही. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 
 
अपहरण सीसीटीव्हीत कैद 
नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरुन  6 सप्टेंबर रोजी या 3 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. भरदिवसा करण्यात आलेले हे अपहरण सीसीटीव्हीत कैद झाले होते. सीसीटीव्हीत आरोपी चिमुरड्याला घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरड्याची आई वाशी रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विकत घेत होती. आपला मुलगा मागेच उभा असल्याने महिला निश्चिंत होती. मात्र नंतर मागे वळून पाहिल्यानंतर आपला मुलगा जागेवर नसल्याचे पाहून त्यांची धावाधाव सुरु झाली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी चिमुरड्याला घेऊन जात असल्याचे दिसून आले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...