आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेर्टाचा अादेश: मुलीची छेड काढणाऱ्या युवकांना सफाईची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल झालेल्या युवकांना माफी देऊन संबंधित मुलीने प्रकरण मिटवण्याची केेलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली खरी, परंतु या प्रकरणातून धडा शिकण्यासाठी संबंधित पाच युवकांना दर रविवारी बदलापूर परिसरात साफसफाई करण्याची ‘शिक्षा’ न्यायालयाने ठाेठावली. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपये कायदेशीर मदत केंद्राला देणगी स्वरूपात देण्याचेही अादेश दिले. या युवकांना नाेव्हेंबर महिन्यात दर अाठवड्याला साफसफाई करावी लागेल.

न्यायमूर्ती अभय अाेक न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘छेडछाड प्रकरणातील पाचही अाराेपी १९ ते २२ वर्षांचे अाहेत. तक्रारदार मुलगी तिची अाई हे प्रकरण फार वाढवण्याच्या मन:स्थितीत नाहीत. हे प्रकरण तसे समाजविघातक दिसत नाही. त्यामुळे या युवकांविराेधात दाखल झालेला एफअायअार रद्द करण्याचे अादेश दिले जात अाहेत. मात्र या पाचही अाराेपींना ‘शिक्षा’ म्हणून समाजसेवा करावी लागेल. नाेव्हेंबर महिन्यातील दर रविवारी या पाच जणांनी बदलापूर परिसरात दाेन-दाेन तास साफसफाई करायची अाहे. स्थानिक पालिकेचे अधिकारी या युवकांचे काम निश्चित करतील तसेच त्यांच्या कामावर लक्षही ठेवतील. नाेव्हेंबरमधील शेवटच्या रविवारी काम संपल्यानंतर पालिका अधिकारी या पाच युवकांना प्रमाणपत्र देतील, जे त्यांना न्यायालयात जमा करावे लागेल. यादरम्यान अाराेपी युवकांना न्यायालयातही गरजेनुसार हजेरी लावावी लागेल.’

काय अाहे प्रकरण?
सप्टेंबर महिन्यात एका अल्पवयीन मुलीने याबाबत तक्रार दिली हाेती. ही मुलगी अारोपी पाच जणांपैकी दाेघांना अाेळखत हाेती. २५ सप्टेंबर राेजी ही मुलगी अापल्या मित्रासह एका अाराेपीच्या घरी गेली हाेती. तिथे असलेल्या दुसऱ्या मित्राने अन्य चार जणांसह संबंधित मुलीची छेडछाड केली, तर तिच्यासाेबत असलेल्या मित्राला मारहाण केली हाेती. मात्र प्रकरण न्यायालयात अाल्यानंतर पीडित मुलीच्या अाईने ‘अापल्याला वारंवार सुनावणीसाठी येणे अशक्य अाहे,’ असे लेखी पत्र न्यायालयात दिले हाेते. अाराेपींनीही माफीसाठी याचना केली हाेती. त्यामुळे पीडित मुलीनेही त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला हाेता.
बातम्या आणखी आहेत...