आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरने FB वर मुलाकडून मागवले न्‍यूड फोटो, ब्‍लॅकमेल करून केला अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एका निवृत्त पोलिस आयुक्ताच्या मुलाने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याचे नाव मिलिंद शेटे आहे. पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.
काय आहे प्रकरण-
पोलिसांनी सांगितले की, मिलिंद शेटे याने फेसबुकवर मुलीच्या नावे खोटे खाते बनवून कांदिवलीतील एका 15 वर्षीय मुलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलाने ही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. दोघांत चॅटिंग सुरु झाले. काही दिवसानंतर शेटे याने अज्ञात मुलीचा नग्न फोटो संबंधित मुलाला पाठवला. तसेच त्याचा न्यूड फोटो मागवला. त्या मुलाने न्यूड फोटो पाठवून दिला व तेथेच तो जाळ्यात अडकला.
असा अडकला जाळ्यात-
15 वर्षाचा मुलगा न्यूड फोटो पाठवून पुरता फसला होता. काही दिवसानंतर मुलीच्या नावाने बनविलेले फेसबुक खाते शेटेने बंद केले. त्यानंतर त्या मुलाला फेसबुकवरून तीर्थ शर्मा नावाच्या खात्यावरून मॅसेज आला. यात म्हटले होते की, तुझा न्यूड फोटो एकी वेबसाईटवर अपलोड केला गेला आहे. संबंधित मुलाने ती वेबसाईट चेक केली. मात्र, तेथे फोटो आढळून आला नाही. त्याने तीर्थ शर्माला एफबीवरच मॅसेज केला की, वेबसाईटवर तर फोटो नाहीये. त्याला उत्तर देताना तीर्थने सांगितले की, तुझा न्यूड फोटो रिशी सोनेचा याने वेबसाईटवर अपलोड केला आहे. तीर्थने त्याला सांगितले की, जर तुला फोटो डिलीट करायचा आहे तर सोनेचा याला रिक्वेस्ट कर.
शेटेच होता सोनेचा-
संबंधित अल्पवयीन मुलाने फेसबुकवर सोनेचा याचे खाते शोधले. तसेच त्याला न्यूड फोटो डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी सोनेचा याने संबंधित मुलाला एका सोसायटीच्या छतावर बोलावले. जेव्हा हा मुलगा तेथे पोहचला तेव्हा त्याला खरा मिलिंद शेटे दिसला. त्याने मुलाला सांगितले की, सोनेचा याने त्याला येथे पाठवले आहे. त्यावेळी शेटे याने मुलाला सांगितले की, मी स्वत: सोनेचापासून त्रस्त आहे. असे सांगून शेटेने संबंधित मुलाला सोनेचा याने मला तसे करायला सांगितले आहे सांगून त्याचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर शेटेने सोनेचाचे नाव सांगून दोनदा शौषण केले. एकदा त्याने त्याला घरीही बोलवून घेतले. त्यामुळे वैतागून मुलाने जेव्हा FB खाते बंद केले. तर, शेटे त्याला फोन करून धमकी देऊ लागला. सोनेचा ऊर्फ मिलिंद शेटेने मुलाला धमकी दिली की जर तू माझे म्हणणे ऐकले नाही तर तुझे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल करेन. यानंतर सुमारे चार महिने या मुलाचे शेटेने शौषण केले.
असा झाला शेटेचा पर्दाफाश-
15 वर्षीय मुलीने वैतागून फेसबुक खाते बंद करून टाकले होते. त्यामुळे मोबाईल धमकीचे मॅसेज पाठवू लागला. एकदा मुलाच्या आईने त्याचा फोन घेतला असता शेटेने त्याला मॅसेज केला. तो मॅसेज आईने वाचला. त्यावेळी आईने मुलाकडे चौकशी केली असता मुलाने घडलेली सर्व माहिती दिली. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी 10 जुलै रोजी मिलिंद शेटेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच सायंकाळी मिलिंद शेटेला अटक केली. पोलिस पुढील चौकशी करीत आहेत. पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे की, मिलिंद शेटे हाच तीर्थ शर्मा, सोनेचा नावाने खोट्या खात्यावरून त्याच्याशी संपर्क करीत होता. या प्रकरणात मिलिंद शेटेचे काही साथीदार असल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...