आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षापासूनचे संबंध तोडल्याने मुंबईत प्रेयसीची भररस्त्यात हत्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता तळवलकर व प्रसाद सावंत यांचा एकत्रित फोटो.... - Divya Marathi
एकता तळवलकर व प्रसाद सावंत यांचा एकत्रित फोटो....
मुंबई- मागील 11 वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधानंतर प्रेयसी टाळू लागल्याच्या रागातून प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची घटना रविवारी घडली. ही घटना मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली. प्रसाद सावंत (29) असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव असून त्याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, एकता व प्रसाद यांचे एकमेंकावर जीवाडपाड प्रेम होते. मात्र, एकताच्या घरच्यानी विरोध केल्याने या दोघांनी आत्मह्त्या करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती पुढे येत आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.
प्रेयसीच्या घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे ती टाळाटाळ करू लागल्यामुळे माथेफिरू प्रसाद सावंतने काळाचौकी परिसरातील भररस्त्यात चाकूने वार करून तरुणीचा गळा चिरला. यात या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. एकता तळवलकर (25) असे या मृत तरूणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबाग येथील देनू कंपाऊंडमध्ये राहणारा प्रसाद हा एका कंपनीत इव्हेंट मॅनेजरचे काम करतो. त्याचे डिलाईल रोड येथे राहत असलेल्या 25 वर्षीय एकता तळवलकरसोबत मागील 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, एकताच्या घरी ही बाब कळल्यानंतर तिच्या पालकांनी त्याचा नाद सोडून देण्यास सांगितले. तरीही प्रसाद तिला भेटत राहिला. काही काळानंतर एकताच्या घरच्यांनी तिला सज्जड दम दिला. त्यामुळे नाईलाज झालेल्या एकताने त्याच्याशी संबंध तोडायचे ठरवले. त्यामुळे एकता त्याला टाळू लागली. यामुळे प्रसाद गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता.
प्रसादने रविवारी एकताला भेटायला बोलवून घेतले. एकता त्य़ाला भेटण्यासाठी काळाचौकी येथील दीपक ज्योती सोसायटीजवळ आली. त्यावेळी आपण पळून जाऊन लग्न करू असे एकताला म्हणाला. एकताने पळून जाऊन लग्न करण्य़ास नकार दिला. तेथे लग्नावरून दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून दारुच्या नशेत सावंतने सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास भररस्त्यात चाकूने एकताच्या गळ्यावर सपासप वार केले.

मानेवर गंभीर वार झाल्याने तरुणी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एकताची हत्या केल्यानंतर प्रसाद काळाचौकी पोलिसांना शरण जात त्यांच्या स्वाधीन झाला. पोलिसांनी प्रसादला अटक केली असून, याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, किती प्रेम होते एकता व प्रसादचे एकमेंकावर...
बातम्या आणखी आहेत...