आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझे धैर्य काैतुकास्पदच.. , अवयवदानाची ब्रँड अॅम्बेसेडर जुही पवारचे काैतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवयवदानाची ब्रँड अॅम्बेसेडर जुही पवार हिने गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट घेतली. ‘तू दाखवलेल्या धैर्याबद्दल अाम्हाला तुझा अभिमान वाटताे. हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून आता संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदानाबद्दल जनजागृती करावी,’ अशा सूचना राज्यपालांनी या वेळी जुहीला दिल्या. या वेळी जुहीची अाई किरण पवार उपस्थित हाेत्या.
दक्षिण भारताचा दाैरा
महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण भारतात अवयवदानासंदर्भात माेठ्या प्रमाणावर जागृती अाहे. या भागाचा अभ्यास करण्यासाठी जुहीला केरळ, चेन्नई या शहरात तिला अभ्यासासाठी पाठवण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

पुण्यात प्रतिसाद
जुहीच्या उपस्थितीत पुण्यातील एका चॅरिटेबल ट्रस्टने अवयवदानासंदर्भात जनजागृतीचा एक कार्यक्रम ठेवला हाेता. या कार्यक्रमानंतर अनेकांनी स्वेच्छेने अवयवदानाचे अर्ज भरून दिल्याचे जुहीने सांगितले.
जुही "एमबीबीएस'ची विद्यार्थिनी
जळगावची रहिवासी असलेली २२ वर्षीय जुही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अाहे. ती मुंबईच्या के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकते. तीन वर्षांपूर्वी तिने यकृताचा ७० टक्के भाग आपले वडील डॉ. रवी पवार यांना दान केला होता. मात्र, दुर्दैवाने कालांतराने त्यांचे किडनीच्या आजारानेे निधन झाले. जुहीच्या या दातृत्वाची दखल घेऊन राज्य सरकारने तिची अवयव दानाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. तिने विश्वसुंदरी स्पर्धेतही भाग घेतला होता.