आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bring 50 Thousand Crores Investment Narayan Rane

फक्त ५० हजार कोटींचीच गुंतवणूक आणून दाखवा, राणेंचे सरकारला अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अच्छे दिन येणार’ ही घोषणा जशी फसवी ठरलीच तशीच ‘मेक इन इंडिया’तील गुंतवणुकीचे आकडे फसवेच ठरणार आहेत. चारा छावण्या बंद करून ‘मेक इन’च्या करमणुकीसाठी केलेला काेटींचा खर्च ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा अाहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केली. अाठ लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे दावे करणाऱ्या सरकारने केवळ ५० हजार कोटींची गुंतवणूक अाणून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. ‘जेएनयू’तील आंदोलनानंतर भाजपाचे नेते राहुल गांधी यांना गाेळ्या घालण्याची धमकी देत अाहेत. त्यांना जशा तसे उत्तर देण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे, असा इशाराही राणेंनी दिला.

पक्षाच्या गांधी भवन कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप सरकारचा समाचार घेतला. ‘कोणतेही करार होण्यापूर्वी संबंधित कंपनीशी किमान दोन-तीन वर्षे चर्चा केली जाते. त्यांना जागा, परवानग्या, मनुष्यबळाबाबत त्यांचे समाधान करावे लागते. मात्र फडणवीस सरकारने अवघ्या आठवडाभरात ८ लाख कोटींचे करार करणे म्हणजे जनतेची निव्वळ फसवणूक आहे. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी पुरेसे नियोजन असावे लागते. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात ते दिसले नाही. आठ वर्षांत आठ लक्ष कोटींची गुंतवणूक येणार असा आकडा सांगण्यात आला आहे. २५९४ सामंजस्य करार झाल्याचे सांगितले जाते. मात्र कोणते उद्योग येणार, त्यांना कुठे जागा देणार, गुंंतवणूकदारांची आर्थिक क्षमता काय याबाबत काहीच सांगितले जात नाही. ही माहिती विस्तृत सांगणारी पुस्तिका सरकारने काढावी’, अशी मागणी त्यांनी केली. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्तम स्टील ही कंपनी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जाते. हा प्रकल्प आघाडी सरकारच्या काळातच मंजूर झालेला आहे. त्या कंपनीला जागाही दिलेली आहे. परंतु या कंपनीची आर्थिक क्षमता नसल्यामुळे नुसते कंपाऊंड घालून ठेवले आहे. पूर्वी झालेला करारच आता पुन्हा दाखवून आकडे वाढविले जात आहेत,’ असे राणे म्हणाले.

पुढे वाचा.. ही तर भाजप नेत्यांच्या करमणुकीची सोय