आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bring Back Sodium Vapour Lamps On Marine Drive, Suggests Bombay Highcourt

LED दिवे बसवून \'क्वीन नेकलेस\'ची शान का घालवता? हायकोर्ट, भाजपला ठेच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सागरकिना-याला क्वीन नेकलेस संबोधले जाते. - Divya Marathi
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सागरकिना-याला क्वीन नेकलेस संबोधले जाते.
मुंबई- हेरिटेज असलेल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिवे लावून ‘क्वीन नेकलेस’च्या सौंदर्याची वाट लावणा-या मुंबई महापालिका प्रशासनाला मुंबई हायकोर्टाने चांगलेच खडसावले. एलईडी दिवे लावून मरीन ड्राईव्हच्या त्या 'क्वीन नेकलेस'ची रया गेली आहे. मुंबईची ही शान घालवू नका, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठाने सुनावतानाच त्या ठिकाणी तत्काळ सोडियम व्हेपरचेच दिवे लावा, असे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. हायकोर्टाच्या या निर्णयाने शिवसेनेने मरीन ड्राइव्हवरील एलईडी दिव्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असून त्यांचा नैतिक विजय झाला आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोएल यांनी देशातील सर्व प्रमुख शहरात वीजबचतीसाठी सोडियम व्हेपरऐवजी एलईडी दिवे लावण्याचे आदेश काढले होते. त्याची अंमलबाजवणी तातडीने देशभर झाली आहे. एलईडी दिव्याचे नक्कीच काही फायदे आहेत मात्र या दिव्यांची लेव्हल (प्रकाश) कमी असल्याचे स्पष्ट आहे. तरीही भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी हे आदेश दिल्याने व राज्यातही भाजप सरकार असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाला सरकारचे आदेश ऐकणे भाग होते. मुंबई पालिकेत शिवसेना सत्तेत असूनही त्यांचे काही चालत नव्हते. यातूनच भाजप-शिवसेनेत तू-तू मैं-मैं सुरु होती. मुंबईतील भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात चांगलेच टि्वटर वॉर रंगले होते. एलईडी दिव्यांचे समर्थन करणा-या शेलारांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या ‘राणीचा हार कोणी चोरला?’ अशी टोलेबाजी केली होती. मुंबईला एलईडी दिवे नको, त्यामुळे 'क्वीन नेकलेस'ची रया गेली आहे असे मत आदित्यने व्यक्त केले होते.

शिवसेनेच्या भूमिकेचा विजय-
या प्रकरणावरून शिवसेना आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. सोडियम व्हेपर दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिव्यांची लेव्हल कमी असल्याचा मुद्दा त्यावेळी गाजला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य करताना याबाबतची चौकशी केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यापूर्वीच आता मुंबई हायकोर्टाने हा विषय निकालात काढला आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबई बार असोसिएशनने मुंबईतील रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या समस्येसंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी न्या. मोहित शहा आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे झाली. या वेळी न्यायमूर्तींनी मरीन ड्राइव्हवरील हेरिटेज असलेल्या क्वीन नेकलेसवरील सोडियम व्हेपरचे दिवे बदलून तिथे लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांची गंभीर दखल घेतली. मुंबईची शान घालवू नका, असे सांगतानाच कोर्टाने मरीन ड्राइव्हवरील एलईडीचे दिवे हटवून तिथे तत्काळ सोडियम व्हेपरचे दिवे लावण्याचे स्पष्ट निर्देश पालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे मुंबईचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी एलईडी दिव्यांविरोधात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा विजयच झाल्याचे मानले जात आहे.
पुढे पाहा व वाचा, मुंबईतील मरीन ड्राईव्हला का म्हटले जाते क्वीन नेकलेस.... काय आहे कारण...
एलईडी दिवे व सोडियम व्हेंपर दिवे असताना कसा दिसतो मरीन ड्राईव्हचा किनारा.. पाहा छायाचित्राद्वारे.....