आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनला जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या 25 टक्के घटली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षणासाठी ब्रिटनला जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील दोन वर्षांत मोठी घसरण झाली आहे. 2010-11 मध्ये हा आकडा 25 टक्क्यांनी घसरला आहे. तर ही घसरण 70 ते 80 टक्के असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रिटनच्या मोठ्या विद्यापीठात आत्तापर्यंत 350 ते 400 विद्यार्थी प्रवेश घेत होते. तेथे या वेळी केवळ 40-50 विद्यार्थीच गेले. अ‍ॅपेक्स कन्सल्टंटचे संचालक तेजस ठक्कर सांगतात की, ‘आजकाल विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडाला प्राधान्य देत आहेत. युरोपची ढासळती अर्थव्यवस्था हेदेखील यामागील एक कारण आहे. शिक्षणानंतर युरोपमध्ये नोकरीच्या कमी संधी असतील, असा अंदाज बांधला जात आहे.’
ब्रिटनला जाणा-या विद्यार्थी संख्येत होणारी घट व्हिसाच्या नियमांमुळे असल्याचेही सांगितले जात आहे. नव्या नियमांनुसार एप्रिल 2012 नंतर तेथे युरोपाबाहेरील कोणीही विद्यार्थी शिक्षणानंतर नोकरीसाठी राहू शकत नाही.