आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Britain\'s Priminister Hit On Oval ; Cricket Play With Local Player

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनच्या पंतप्रधानांची ‘ओव्हल’वर फटकेबाजी ; स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माणूस कोणत्याही पदावर असला तरी त्याचा छंद त्याची पाठ सोडत नाही. मुंबईभेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्याबाबतीतही काहीसे असेच झाले. सोमवारी त्यांनी ओव्हल मैदानावर काही खेळाडू क्रिकेट खेळत असल्याचे पाहिल्यानंतर कॅमरॉन यांना मोह आवरला नाही. मग कॅमरॉन यांनी स्थानिक खेळाडूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत आपले कौशल्य दाखवून दिले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास 2६ /11 मधील शहीद जवानांना अभिवादन केल्यानंतर कॅमरॉन यांनी थेट क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. नियोजित कार्यक्रमात हा दौरा नसल्यामुळे पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला. मैदानाच्या भोवती पोलिसांची कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली. पोलिस जिमखाना येथून निघाल्यानंतर कॅमरॉन थेट ओव्हल मैदानात पोहोचले. मूळ इंग्लडच्या मात्र मुंबईत राहणा-या काही महिला खेळाडू तिथे सरावासाठी आल्या होत्या. कॅमरॉन यांनी त्यांच्याशी आवर्जून चर्चा केली. तर मैदानात क्रिकेट खेळणा-या स्थानिक खेळाडूंचा सरावात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. स्थानिक खेळाडूंच्या गोलंदाजीवर कॅमरॉन यांनी फटकेबाजीही केली. 4 वाजून 10 मिनीटांनी कॅमरॉन यांनी सर्व खेळाडूंची भेट घेऊनच मैदान सोडले.मात्र, या दहा मिनीटांच्या आकस्मिक खेळासाठी पोलीसांना गृहविभागाकडून तातडीने परवानगी घ्यावी लागली.