आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार कोसळत होती भिंत, स्वप्नात येऊन लक्ष्मीमातेने सांगितला हा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिराच्या आत असलेली महालक्ष्मीची मुर्ती. (इन्सॅटमध्ये समुद्र किनारी बनलेले महालक्ष्मी मंदिर) - Divya Marathi
मंदिराच्या आत असलेली महालक्ष्मीची मुर्ती. (इन्सॅटमध्ये समुद्र किनारी बनलेले महालक्ष्मी मंदिर)
मुंबई- देवी लक्ष्मीच्या आराधनेचे पर्व दिवाळीत येते. आज आम्ही तुम्हाला मुंबईतील महालक्ष्मी मंदिराविषयी माहिती देणार आहोत. ऐतिहासिक आणि आश्चर्यात पाडणाऱ्या या मंदिराच्या निर्मितीची ही गोष्ट आहे. या मंदिराच्या छोट्या स्वरुपाचे निर्माण सर्वप्रथम ब्रिटिश इंजिनिअरने केले होते. एक भिंत बांधत असताना या इंजिनिअरच्या स्वप्नात लक्ष्मीमाता आली. मातेने त्याला समुद्रात पडलेल्या आपल्या प्रतिमेविषयी सांगितले. त्यानंतर ब्रिटिश इंजिनिअरने ही प्रतिमा शोधली आणि लक्ष्मीमातेचे एक छोटेसे मंदिर उभारले. त्याचा विस्तार 1831 मध्ये धाकजी दादाजी नावाच्या व्यापाऱ्याने केला.
 
लक्ष्मीमातेने स्वत: सांगितली समुद्रात पडलेल्या मुर्तीची माहिती
- मुंबईतील भुलाभाऊ देसाई मार्गावर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या मंदिराविषयी सांगण्यात येते की, वरळी आणि मलबार हिल भागाला जोडणारी एक भिंत उभारण्यात येत होती.
- ही भिंत वारंवार कोसळत होती. ब्रिटिश इंजिनिअर यामुळे त्रस्त झाले होते.
- प्रकल्पाच्या मुख्य इंजिनिअरच्या स्वप्नात त्यावेळी महालक्ष्मी आली. तिने त्याला सांगितले की माझी मुर्ती वरळीच्या समुद्रात आहे. तुम्ही ती मुर्ती काढून माझे मंदिर बांधा.
- त्यानंतर शोध घेतल्यावर मुर्ती सापडली. मुख्य इंजिनिअरने या ठिकाणी महालक्ष्मीचे छोटे मंदिर बांधले. त्यानंतर भिंत उभारण्यात कोणतीही अडचण आली नाही.
 
मंदिरात आहे हे खास
- समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने हे मंदिर खूपच सुंदर दिसते.
- मंदिराच्या आत महालक्ष्मी, देवी महाकाली आणि महासरस्वतीच्या मुर्ती आहेत.
- तिन्ही मुर्तींच्या नाकात नथ, हातात सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचा हार आहे.
- तिन्ही मुर्तींच्या नाकात नथ, हातात सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचा हार आहे.
- महालक्ष्मीची मुर्ती ही वाघावर स्वार असुन महिषासुराचा वध करत आहे. नवरात्रीत महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना अनेक तास लागतात.
 
मंदिराच्या मागे चिकटण्यात येतात नाणी
- मंदिराच्या मागे भिंतीवर नवस बोलणारे नाणी चिकटवतात. येथे हजारो नाणी आपोआपच चिकटलेली दिसतात.
- मंदिराच्या मागील पायऱ्या उतरल्यानंतर समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. 
 
नाही होत खऱ्या मुर्तीचे दर्शन
- लोक महालक्ष्मीचे दर्शन ज्या रुपात घेतात ती तिची खरी मुर्ती नाही.
- तिन्ही मुर्ती सोन्याच्या मुखवट्याने झाकलेल्या आहेत. मंदिरात असणारी महालक्ष्मीची मुर्ती स्वयंभू आहे. 
नाही होत खऱ्या मुर्तीचे दर्शन
- लोक महालक्ष्मीचे दर्शन ज्या रुपात घेतात ती तिची खरी मुर्ती नाही.
- तिन्ही मुर्ती सोन्याच्या मुखवट्याने झाकलेल्या आहेत. मंदिरात असणारी महालक्ष्मीची मुर्ती स्वयंभू आहे. 
- खरी मुर्ती खूपच कमी लोकांनी पाहिली आहे. खऱ्या मुर्तीचे दर्शन रात्री साडेनऊ वाजता होऊ शकते.
- बंद होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे अगोदर दर्शनासाठी मुर्ती खऱ्या स्वरुपात ठेवण्यात येते. 
- सकाळी 6 वाजता मंदिर उघडल्यावर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर लगेच मुर्तींवर मुखवटा चढण्यात येतो.    
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...