आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Royal Couple Prince William And Kate Middleton In Mumbai

PHOTOS: शाही दाम्पत्य विल्यम- केटने सचिनसोबत लुटला मुंबईत क्रिकेटचा आनंद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना प्रिन्सेस केट... - Divya Marathi
सचिनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना प्रिन्सेस केट...
मुंबई- ब्रिटनमधील रॉयल फॅमिली राजकुमार विल्यम (ड्यूक ऑफ क्रेंब्रिज) आणि त्याची पत्नी केट मिडेलटन रविवारी भारत दौ-यावर आले. मुंबईत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर हे शाही दाम्पत्य हॉटेल ताजमध्ये पोहचले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर या शाही जोडप्याने हल्ल्यादरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या व जखमी झालेल्या कर्मचा-यांशी संवाद साधला. यावेळी विल्यम आणि केट यांनी त्यांची आस्थेने माहिती घेतली. यानंतर ते दोघे ताजमध्ये विश्रांतीला गेले.
विश्रांतीच्या वेळेस या शाही दाम्पत्याने दुपारचे जेवण हॉटेल ताजमध्ये घेतले. शेफ रघू यांनी विल्यम व केट यांच्यासाठी खास शाकाहरी जेवण तयार केले होते. शाकाहरी कबाब, वरणभात, भेंडी फ्रायची भाजी व इतर पदार्थ असा खास बेत होता. विल्यम-केट यांनी रघूचे कौतूक केले.
जेवणानंतर व विश्रांती घेतल्यानंतर प्रिन्स आणि प्रिन्सेस विल्यम-केट यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर जाणे पसंत केले. यावेळी काही स्वयंसेवी संस्थांनी मदतनिधी सामना आयोजित केला होता. या सामन्याला या जोडप्याने हजेरी लावली.
यावेळी सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, दिलीप वेंगसरकर आदी उपस्थित होते. या सामन्यानंतर विल्यम आणि केट यांनी झोपडपट्टीतील मुलांसमवेत संवाद साधला व त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. यात सचिनसह वेंगसरकर हे सुद्धा सहभागी झाले. विल्यम आणि केट यांनी सचिनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली तर वेंगसरकर यांनी विकेट किपिंग केली. केट यांनी फटकेबाजी केल्यानंतर त्या सचिनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्या.
यानंतर सायंकाळी या शाही दाम्पत्याने दक्षिण मुंबईतील वाळकेश्वरमधील ऐतिहासिक बाणगंगा तलावाला भेट दिली. या वेळी तेथे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले गेले. यानंतर रात्री उशिरा ताज महाल हॉटेलमध्येच बॉलिवूड व मुंबईतील उद्योगविश्वातील सेलिब्रेटी आणि शाही दाम्पत्य यांच्या स्नेहभेटीचा आणि स्नेहभोजनाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बॉलीवूड व उद्योगजगतातील अनेक दिग्गज या वेळी उपस्थित होते.
डब्बेवाले केटला देणार खास पैठणीची भेट-

मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनमधील रॉयल फॅमिलीचे खास जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रिन्स विल्यम यांचे वडिल प्रिन्स चार्ल्स यांनी डब्बेवाल्यांना लंडनमध्ये बोलवून त्यांच्या कार्याचे व सेवेचे कौतूक केले होते. आता प्रिन्स चार्ल्स यांचा मुलगा व सूनबाई मुंबईत दाखल होताच डब्बेवाल्यांनी त्यांचा खास सत्कार करण्याचे व केट यांना भेट देण्याचे ठरवले. डब्बेवाले रविवारी सायंकाळीच विल्यम व केट यांचा सत्कार करणार होते. मात्र, या दाम्पत्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो आज करण्यात येणार आहे. मुंबईतील ब्रिटन दूतावासात डब्बेवाले या जोडीचा सत्कार करतील व केटला खास पैठणीची भेट देतील. केट यांना जी पैठणी दिली जाणार आहे त्या पैठणीवर पंढरपूरच्या विठ्ठलाचे छायाचित्र काढले आहे.
पुढे छायाचित्रातून पाहा, विल्यम व केट यांनी रविवारी दिवसभर मुंबईत कसा लुटला आनंद..