आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी चालवायचा रिक्षा; कोट्याधिश बनल्यानंतर पूजेत ठेवले 88 लाख, सव्वा किलो सोने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे एक रिअल इस्टेट ब्रोकर चर्चेत आला आहे. के. सूर्यनारायण असे या ब्रोकरचे नाव असून तो बंगळुरु येथील रहिवासी आहे.

के. सूर्यनारायण याने घरी आयोजित केलेल्या पूजेत आपली संपूर्ण मालमत्ता ठेवली. इतकेच नव्हे तर फोटो क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर त्याच्या मागे प्राप्तीकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. के.सूर्यनारायण कधीकाळी रिक्षा चालवत होता. नंतर त्याने ब्रोकिंगचे काम करून मोठी मालमत्ता कमावली आहे.
 
लक्ष्मीच्या मूर्तीखाली ठेवले 88 लाख रूपये...
- ब्रोकर सूर्यनारायणने राहात्या घरी लक्ष्मी पूजनाचे आयोजन केले होते.
- पूजेसाठी त्याने संपूर्ण बॅंकेत ठेवलेली जमापूंजी विथड्रा करून घरी आणली. त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवली.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने पूजेत 88 लाख रोकड आणि 1.24 किलो सोने ठेवले होते.
- पूजेनंतर त्याने पत्नीसोबत फोटो क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
- पूजेत त्याने लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती.

सूर्यनारायण म्हणाला... परिश्रमाचे फळ!
- सोशल मीडियावर आलेल्या कमेंट पाहून सूर्यनारायण याने प्रतिक्रिया दिली आहे.
- ही मालमत्ता म्हणजे परिश्रमाचे फळ असल्याचे त्याने म्हटले आहे.
- त्याने सांगितले की 88 लाख रूपये आणि 1.24 किलो सोने बॅंकेतून पूजेसाठी बाहेर काढले होते.
- सूर्यनारायण याने एका पोस्टमध्ये म्हटले की, त्याने रिक्षा चालवून ब्रोकिंगचा बिझनेस करून प्रथत यश मिळवले आहे.  
- मीडिया रिपोर्ट्स, सूर्यनारायणकडे 15 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो दरवर्षी 13 लाख रूपये टॅक्स भरतो.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... के.सूर्यनारायण याने पूजेत ठेवले 88 लाख रुपये आणि सव्वा किलो सोन्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...