आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून बहिणीची सख्ख्या भावांकडून हत्या, दोघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : युवकासोबत असलेल्या प्रेमप्रकरणाला विरोध असणाऱ्या भावंडांनी बहिणीची हत्या घडवून आणल्याची घटना बोरिवलीमध्ये घडली. बहिणीचे एका युवकाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची कुणकुण या भावंडांना आधीपासूनच होती.
याबाबत त्यांनी बहिणीला अनेकदा समजावूनही सांगितले होते. मात्र, बहिणीचे त्या युवकाशी लपूनछपून भेटीगाठी सुरूच होत्या. दरम्यान, गुरूवारी बहीण प्रियकरासोबत असल्याची माहिती भावंडांना मिळाली. त्यांनी रागाच्या भरात बोरिवली भागातील घटनास्थळ गाठले आणि दोघांवरही हल्ला चढवला.
यात त्यांची बहीण जागीच ठार झाली. तर, १८ वर्षीय प्रियकर जखमी झाला असून त्यास अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपी भावंडांपैकी एकाने तत्काळ पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले, तर दुसऱ्याला पोलिसांनी स्थानिक भागातूनच अटक केली.
बातम्या आणखी आहेत...