आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BRP Leader Prakash Ambedkar Blame On Rajiv Shukla

राजीव शुक्लांनी गोपनीय माहिती पाकला पुरवली; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2004 मध्ये पाकिस्तानात झालेल्या भारत-पाक क्रिकेट सामन्यावेळी केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला पाकिस्तानातील गुप्तचर संस्था असलेल्या ‘आयएसआय’ अधिकार्‍यांना भेटले होते. त्या वेळी शुक्ला यांनी भारताबाबतची गुप्त माहिती या देशाला पुरवली होती, असा खळबळजनक आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

गडाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावेळी ‘बीसीसीआय’चे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यामध्ये तत्कालीन खासदार राजीव शुक्ला यांचा समावेश होता. त्या वेळी शुक्ला यांनी भारताचा क्रमांक एकचा शत्रू असणार्‍या व्यक्तीची भेट घेतली होती. तसेच ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा म्होरक्या मेजर अतीक उर रहमान यांना शुक्ला यांनी काही गोपनीय कागदपत्रे दिली होती, असा दावा आंबेडकर यांनी केला.

कागदपत्रे परराष्ट्र मंत्रालयाकडून
‘बीसीसीआय’च्या शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उपस्थित असणारे शुक्ला त्या वेळी कोणाला भेटले, कुठे गेले त्याचा तपशील असणारी कागदपत्रेही अँड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. ही गोपनीय कागदपत्रे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकार्‍याने आपणास दिली असून याप्रकरणी शुक्ला यांची चौकशी करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. या आरोपांमुळे आधीच स्पॉट फिक्सिंगमुळे पद सोडावे लागलेल्या शुक्लांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहेत राजीव शुक्ला ?
कॉँग्रेसचे खासदार असलेले राजीव शुक्ला 2004 मध्ये पाकिस्तानला गेले होते, त्या वेळी केंद्रात ‘एनडीए’ आघाडीचे सरकार होते व पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. शुक्ला सध्या केंद्रात संसदीय कार्य राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत आहेत. 2008 पासून ते इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) चेअरमन होते. परंतु नुकत्याच झालेल्या स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगचा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्ला यांनी ‘आयपीएल’च्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे.