आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएमविरोधात ‘बसप’ रस्त्यावर; मुंबईत कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन) मध्ये घोटाळा करून यश मिळवले असून यापुढील सर्व निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी करत बहुजन समाज पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. 
  
आझाद मैदानावर प्रदेश बसपच्या वतीने धरणे आंदोलन धरण्यात आले. मुंबई आणि राज्याच्या विविध भागांतून बसपच्या हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनास उपस्थिती लावली होती.  उत्तर प्रदेशात २२ टक्के दलित, १९ टक्के मुस्लिम आणि १० टक्के यादव मतदार आहेत. या तीन गटांचे ५० टक्के मतदार भाजपविरोधात होते. ब्राह्मण आणि ठाकूर इतर पक्षांमध्ये विखुरलेले हाेते. तरीसुद्धा येथे भाजपला तीनशेपेक्षा अधिक जागा कशा मिळाल्या, असा सवाल बसप प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी केला. तसेच यूपीमधील भाजपचे यश ईव्हीएम घोटाळ्याचे असल्याचा आरोपही गरुड यांनी केला.  

यापुढील सर्व निवडणुकांतून ईव्हीएम हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत बसप आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा राज्याचे प्रभारी, बसप खासदार वीरसिंग यांनी दिला. त्याचाच भाग म्हणून दर महिन्याच्या ११ तारखेला आपला पक्ष ईव्हीएम मशीनविरोधात देशभर आंदोलन करत राहील, असे वीरसिंग यांनी सांगितले.    
बातम्या आणखी आहेत...