आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ना-यावरून आमच्‍या देशप्रेमाचे आकलन करू नका - आमदार जलील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनाही निलंबित करावे अशी मागणी खडसे यांनी केली आहे. - Divya Marathi
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनाही निलंबित करावे अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
मुंबई- ‘भारत माता की जय’ या घोषणेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. लोकसभेनंतर बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेतही हा विषय गाजला. ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, असे म्हणणारे भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आले. या वादानंतर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले की, आम्‍ही देशाचा आदर, सन्‍मान करतो. मात्र एका ना-यावर आमच्‍या देशप्रेमाचे आकलन करू नका. या प्रकारामुळे आज लोकशाहीचा गळा घोटला गेला, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. काय म्‍हणाले आमदार जलील..
- हा आमचा देश आहे. त्‍याचा आदर सन्‍मान आम्‍ही करत आम्‍ही करतो.
- देशाच्‍या अपमानाचा आम्‍ही विचारही करू शकत नाही.
- मात्र, एका ना-यावरून आमच्‍या देशप्रेमाचे आकलन करू नका.
- भाजप, शिवसेना, कॉंग्रेससह सर्व पक्षांचे लोक आमच्‍याविरोधात एकत्र आले.
- या प्रकारामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे.
- 'भारत माता की जय', असे म्‍हणूनच प्रेम व्‍यक्‍त करा असे संविधानात सांगितले नाही.
- भाजपचे आमदार पठाण यांना वारंवार जबरदस्‍ती करत होते, की भारत माता की जय म्‍हणा.
एकमताने पठाण यांचे निलंबन..
विधानसभेत एकमताने वारिस पठाण यांचे निलंबन करण्यात आले. औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीही 'भारत माता की जय' म्हणणार नाही' असे वक्तव्य केले. त्यानंतर विधानसभेत भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ केला. पठाण यांना निलंबित करावे, अशी मागणी महसूल मंत्री एकनाथ खडसे व मुंबईचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, मुस्लीम धर्मानुसार, माता ही केवळ जन्मदात्रीच...
काय म्‍हणाले, एकनाथ खडसे व गिरीश बापट..
बातम्या आणखी आहेत...