आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्रायल अधिकाऱ्यांनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इस्रायलमधील विदेश सेवेमध्ये नव्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळास भेट देऊन विधानसभा, विधान परिषदेचे कामकाज, त्याच्या पद्धती यांची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही सभागृहांतील प्रश्नोत्तराच्या तासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
इस्रायलच्या विदेश सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचा भाग म्हणून बुधवारी विधान भवनास भेट दिली. इस्रायलचे भारतातील महावाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह, उप महावाणिज्यदूत निमरोड ॲसुलिन यांच्यासह इस्रायल विदेश सेवेतील जॉनथन बोरेल, रोलफ झिलबेरमन, अनॉथ फिशरस्टिन, रोटेम सेल्गेव्ह तसेच अनय जोगळेकर आदींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, उपसचिव महेंद्र काज आदींनी त्यांचे स्वागत केले.
विधानसभा तसेच विधान परिषदेच्या प्रश्नोत्तर तासाचे कामकाज कसे चालते याची माहिती इस्रायलच्या शिष्टमंडळाने प्रेक्षक गॅलरीत बसून घेतली. यानंतर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व प्रधान सचिव डॉ. कळसे यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

निंबाळकर म्हणाले की, ‘भारत आणि इस्रायल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इस्रायल या देशाने कृषी क्षेत्रात केलेली प्रगती वाखणण्याजोगी आहे. सध्या देशात तसेच महाराष्ट्रात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राला इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागणार आहे. इस्रायलकडून कृषी तंत्रज्ञान, कमी पाण्यात व कमी जमिनीत जास्त उत्पादनाचे तंत्र जाणून घेण्यात रस आहे. इस्रायलमधील कृषी क्षेत्राची तसेच लोकशाही प्रक्रियेची माहिती महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना होण्यासाठी विधानमंडळातर्फे देवाण-घेवाण कार्यक्रम आखण्याचा विचार अाहे.’ विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. कळसे यांनी राज्यघटनेतील विधिमंडळाचे स्थान, राज्य विधिमंडळाचे कामकाज याविषयी शिष्टमंडळास माहिती दिली.
माहितीची देवाणघेवाण व्हावी
> महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. या राज्याकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. इस्रायल देश महाराष्ट्राशी आपले मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यास इच्छुक आहे. तसेच इस्रायल व महाराष्ट्रामध्ये माहितीच्या देवाणघेवाणीसाठी कार्यक्रम आखावा, त्यास सर्व सहकार्य करण्यात येईल.
अकोव्ह, महावाणिज्य दूत इस्रायल
बातम्या आणखी आहेत...