आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builder Hiranandani Is A Child Of Congress, Shivsena Critics On Govt Policy

\'हिरानंदानी हे तर काँग्रेसचेच पिल्लू\', रानडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केले सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पवईतील प्रख्यात बिल्डर हिरानंदानी हे तर काँग्रेसचेच पिल्लू आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी केली आहे. तसेच शिवसेना हिरानंदानींना पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही असे म्हटले आहे. दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र लोकशाही आघाडीने (एमडीएफ) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गरीबांना स्वस्त घरे ही अफवा नसून सरकारी योजना असल्याचे लक्षात आणून दिले आहे. तसेच हे अभिनव पद्धतीने केलेले आंदोलन आहे असे सांगत मिलिंद रानडेंनी मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले आहेत. त्याचे राज्यातील जनतेला उत्तर द्यावे असे नमूद केले आहे.
कोणते कोणते सवाल उपस्थित केले आहेत रानडे यांनी, वाचा...
- केवळ 40 पैसे चौरस फुटाने राज्य सरकारने 1986 मध्ये हिरानंदनी बिल्डरला 230 एकर जमीन दिली नाही का?
- राज्य सरकार व हिरानंदानी यांच्यातील संयुक्त करारानुसार 10 वर्षात घरे उपलब्ध करून देण्यात येणार नव्हती काय?
- करारानुसार हिरानंदानी जेवढी घरे उपलब्ध करून देणार होते त्यातील 50 टक्के 400 स्क्वेयर फुटांची व 50 टक्के घरे 800 स्क्वेयर फुटांची घरे गोरगरीब व मध्यमवर्गीयांना देण्यात येणार नव्हती काय?
- ही घरे 135 रूपये प्रति स्क्वेयर फुट दराने म्हणजेच सुमारे 54 हजारांत देण्यात येणार नव्हती काय?
- हिरानंदानीने ठरलेल्या करारानुसार घरे वाटप केली आहेत काय?
- जर केली आहेत तर ती कोणाकोणाला दिली आहेत याचा सरकार खुलासा करेल काय?
- कोर्टाने हिरानंदानी अटक करण्याचे आदेश दिल्यानंतरही अटक का करण्यात आली नाही?
- कोर्टाने दोन वर्षापूर्वी हिरानंदानी संकुलातील 3 हजार घरे गरीबांना द्यावीत असे आदेश दिले नव्हते काय?
पुढे वाचा, कोण राहत आहे गरीबांच्या घरात...