आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचा ताबा देण्यास दिरंगाई करणाऱ्या बिल्डरला 6 वर्षाचा तुरंगवास, ग्राहकमंचाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- घराचा ताबा देण्यास टाळालाळ करणाऱ्या बिल्डरला माहाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने साहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमित पालशेतकर असे या बिल्डरचे नाव आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा हा निर्णय ऐतिहासीक मानला जात आहे. एका वृत्तपत्राने याबाबचे वृत्त दिले आहे. 

असे आहे प्रकरण?
मुंबईतील मीरा रोड येथील चंद्रप्रकाश सिंह यांनी दोन नव्या घरांसाठी 2010 मध्ये साई निनाद एण्टरप्रायजेसचे अमित पालशेतकरला पैसे दिले होते. 2013 पर्यंत या घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंतु, पालशेतकर याने अनेक कारणे पुढे करत सहा वर्ष टोलवा-टोलवी केली. परंतु, सहा वर्ष उलटूनही ताबा मिळत नसल्याने चंद्रप्रकाश सिंह यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवली. आयोगाने सिंह यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. चौकशीत दोषी आढळल्याने बिल्डर अमित पालशेतकर यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
 
गृहपकल्प अद्याप पूर्ण झालाच  नाही...
चंद्रप्रकाश सिंह हे एक रेल्वे कर्मचारी आहेत. 2010 मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी अमित मालशेतकरच्या मध्यमातून नवघरमध्ये दोन घरं बुक केली होती. या दोन्ही घरांची किंमत साडे 42 लाख रुपये एवढी होती. सिंह यांनी टू बीएचकेसाठी 11.40 लाख आणि 1 बीएचकेसाठी 7.50 लाख रुपये भरले होते. घराचा ताबा 2013 पर्यंत मिळणार होता. परंतु,  हा गृहपकल्प अद्याप पूर्ण झालाच नाही. त्यामुळे सिंह यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आयोगाना तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन मालशेतकर यांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...