आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ​ महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमित पालशेतकर असे या बिल्डरचे नाव आहे.

मीरा रोड परिसरातील चंद्रप्रकाश सिंह यांनी, दोन नव्या घरांसाठी 2010 मध्ये साई निनाद एण्टरप्रायजेसला पैसे दिले होते. या घराचा ताबा 2013 मध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र बिल्डरने घराचा ताबा आज देतो, उद्या असे म्हणत अनेक वर्ष टोलवा-टोलवी केली. त्यामुळे चंद्रप्रकाश सिंह यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली.
 
आयोगाने सिंह यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यानंतर बिल्डर अमित पालशेतकर यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या चंद्रप्रकाश सिंह यांनी 2010 मध्ये निवृत्तीनंतर नवघरमध्ये दोन घरे बुक केली होती.
या दोन्ही घरांची किंमत 42.52 लाख रुपये होती. त्यावेळी सिंह यांनी टू बीएचके घरासाठी 11.40 लाख तर 1 बीएचके घरासाठी 7.50 लाख रुपये भरले होते. घराचा ताबा 2013 पर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र अजूनही हा गृहपकल्प पूर्ण झालेलाच नाही. त्यामुळे सिंह यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
 
 
बातम्या आणखी आहेत...