आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाशीत भरदिवसा बिल्डरची हत्या, एकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वाशी येथे सेक्टर 29 मध्ये चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून एका बिल्डरची शनिवारी सकाळी हत्या केली. सुनीलकुमार असे मृत बिल्डरचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली असून इतर तिघे मात्र फरार झाले आहेत. हल्लेखोरांनी कुमार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्ला झाला तेव्हा जवळच पोलिसांचे गस्ती पथक होते. त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करून एका हल्लेखोराला अटक केली.

मात्र, इतर तीन जण फरार झाले. दरम्यान, कुमार यांच्या एस. के. डेव्हलपर्स या कार्यालयात गेल्या दोन वर्षांत चार वेळा चो-या झाल्या आहेत. या सर्व चो-या कागदपत्रे चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुनीलकुमार यांच्या हत्येमागे प्रॉपर्टीचा वाद असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या हत्येमागे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या भावाचा हात असल्याचे बोलले जात आहे.