आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builder Rajendra Singh Murdered At Vasai nalasopara

मुंबई: नालासोपा-यात बिल्डरवर अज्ञाताकडून भरदिवसा गोळीबार, बिल्डरचा जागीच मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वसई-नालासोपारा भागात आज भर दुपारी अज्ञाताकडून एका बिल्डरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात या बिल्डराचा जागीच मृत्यू झाला. राजेश सिंग असे या मृत बिल्डरचे नाव आहे. भरदिवसा ही हत्या घडवून आणल्याने नालासोपा-यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी राजेश सिंग यांच्या हत्येप्रकरणी 2 अज्ञात इसामाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर कोण होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिस पुढील चौकशीसाठी कामाला लागले आहेत.
राजेश हे त्रिलोकचंद गॅस एजन्सीचे मालकही होते. याचबरोबर बांधकाम व्यावयासातही त्यांनी नाव कमावले होते. आज दुपारी 12 च्या सुमारास ते आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. बाथरूमला बाहेर जात असताना ऑफिसच्या शेजारील श्री पद्मावती जेम्स दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. त्यात राजेश सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.